आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:लोकांच्या संपर्कात रहा तरच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल - जयंत पाटील

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याअगोदर पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांनी केले.

लोकांच्या संपर्कापासून दूर जावू नका त्यांच्या संपर्कात रहा तरच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. संघटना व्यवस्थित बांधा. त्याकडे दुर्लक्ष करु नका. नवी पिढी पुढे आणली पाहिजे. सक्षम खंबीर व शरद पवार साहेबांचा विचार पोचवणारा कार्यकर्ता तयार करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा हा पाचवा दिवस असून आज माहूर-किनवट विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. याअगोदर पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांनी केले. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मतदारसंघात अनेक विकासकामांची मागणी केली. या बैठकीत जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बुथ कमिट्या सक्षम करण्याचे आवाहन केले.

या आढावा बैठकीला मराठवाडा संपर्क प्रमुख व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, माजी आमदार प्रदीप नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, माहूर नगराध्यक्ष शितल जाधव, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...