आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेत कोरोना संकटकाळात सुमारे १०० प्रशासकीय ठराव मंजूर झाले. मात्र, गेल्या एका महिन्यात २०० पर्यंत ठराव मंजूर झाले. यातील काही ठराव संबंधित विभागांपासून दडवून ठेवण्यात आले होते, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कार्यभार सोडल्यावर अधिकारी सांगत आहेत.
राज्यात सत्तांतर होताच पांडेय यांच्या बदलीचे वारे वाहू लागले. आज ना उद्या आपण जाणार असे लक्षात येताच पांडेय यांनी रॅम्की कंपनीला २५ कोटी रुपये देण्यासह अनेक ठराव मंजूर करून घेतले. नगर सचिव कार्यालयाने ते दडवून ठेवले. लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने पांडेय एप्रिल २०२० पासून प्रशासक झाले. महापौर, स्थायी समिती सभापती, सर्वसाधारण सभेचे अधिकार त्यांच्याकडे आले. तेव्हापासून जून २०२२ पर्यंत मनपा प्रशासकांनी विविध स्वरूपाचे सुमारे ३०० ठराव मंजूर केले होते. त्यातील २०० हे ३० जून ते ३० जुलै कालावधीतील आहेत. शेवटचा ठराव क्रमांक ४९८ आहे, असा दावा सूत्रांनी केला.
पांडेय यांनी मंजूर केलेले बहुतांश ठराव महापालिकेचे भूखंड भाडेपट्ट्याने देणे, काही कर्मचाऱ्यांची थकलेली वैद्यकीय बिले तसेच ठेकेदारांच्या कामाची देयके मंजूर करणे, काही जणांना नवीन काम देणे अशा स्वरुपाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.