आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुली बुद्धिबळ स्पर्धा:भूमिका, कौस्तुभ, आर्यन, ओजलने पटकावले सुवर्णपदक; 77 खेळांडूनी घेतला सहभाग

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत 8, 10, 12, 14 व खुल्या गटात मिळून एकूण 77 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत भूमिका वाघले, कौस्तुभ वाघ, आर्यन सोनवणे, राजवर्धन झंवर, ओजल शेवतेकर आणि सुदिप पाटील यांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सहा आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत ओम तांबटकर आणि चैतन्य कळकाटे या दोन दिव्यांग व अंध खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक गटात पहिल्या पाच विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. त्याचबरोबर, संस्कृती ग्लोबल स्कूलच्या संघाला प्रोत्साहनपर गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण

विजेत्या खेळाडूंना औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, अजय पटेल, गरवारे सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, प्रशिक्षक विलास राजपूत, मिथुन वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत रौतल्ले यांनी केले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :

बाल खेळाडू - अधिरा शेवतेकर, अन्वेशा खाकसे, शिवांश थोरे.

8 वर्षाखलील गट - भूमिका वाघले, अयाण चक्रबर्ती, गवळी भक्ती, देवांश तोतला, स्वरा लड्डा. 10 वर्षाखालील गट - कौस्तुभ वाघ, सुमेध मोराळकर, सोहम गडगिले, आर्यन कुलकर्णी, सक्षम जैन.

12 वर्षाखालील गट - आर्यन सोनवणे, तनय कवाडे, साई बहुरे, रणवीर बहुरे, प्रथमेश बडक.

14 वर्षाखालील गट - राजवर्धन झंवर, पूर्वा देशपांडे, संस्कृती मोराळक, सानिका माळी, कारुण्या वागले.

16 वर्षाखालील गट - ओजल शेवतेकर.

खुला गट - सुदिप पाटील, श्रीराम पाटील, निखिल चौथमल, बाळासाहेब म्हस्के, मधुर तामने.

बातम्या आणखी आहेत...