आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेत्या खेळाडूंचा चषक:खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आज कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बुद्धिबळ संघटना व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आज रविवारी कम्युनिटी सेंटर सिडको एन-७ येथे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८, १०, १२, १४, १६ वर्षांखालील आणि खुल्या गटाम खेळवली जाईल. यादरम्यान स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा चषक आणि सर्व सहभागींना खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाईल. त्याचबरोबर सर्वोत्तम बाल, महिला, ज्येष्ठ व दिव्यांग खेळाडूंना विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी मास्क वापरणे आवश्यक असून खेळाडूंनी बुद्धिबळ संच व घड्याळ स्वत: आणवे. याशिवाय इच्छुक खेळाडूंनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मिथुन वाघमारे, विलास राजपूत, संयोजक अजय पटेल यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल आणि सुनील सुतावणे यांच्या वतीने करण्यात आले आहेे.

बातम्या आणखी आहेत...