आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:जीनियस चेस अकादमीतर्फे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे रविवारी सिल्लोडला आयोजन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीनियस चेस अकादमीतर्फे खुल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे ११ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा ९ व १४ वर्षांखालील गट व खुल्या गटात खेळवली जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. उर्वरित खेळाडूंना पदक देण्यात येणार आहे. बाल खेळाडू व सर्वोत्तम शाळा व अकादमीच्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिके ठेवली आहेत. जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मयूरेश समिंद्रे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...