आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:मुक्त सृजन साहित्य संमेलन गोव्यात ; पणजीत मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते होईल उद्घाटन

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त सृजन साहित्य पत्रिका, पणजीचे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, माधव राघव प्रकाशन ताळगाव तसेच मनसा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील पणजी शहरात ११, १२ सप्टेंबरदरम्यान पहिले दोनदिवसीय मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून लेखक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, तर स्वागताध्यक्ष डॉ. मुरहरी केळे असणार आहेत, अशी माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली. इन्स्टिटट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संमेलन होईल. ११ सप्टेंबरला सकाळी ८.१५ वाजता ग्रंथदिंडी, ९.३० वाजता उद्घाटन होईल. या वेळी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, आमदार सतीश चव्हाण, रमाकांत खलप, संजय आवटे, डॉ. यशपाल भिंगे, दशरथ परब उपस्थित राहणार आहेत. २०२१ च्या मुक्त सृजन पुरस्काराचे प्रकाशन होईल. पत्रकार परिषदेला डॉ. महेश खरात, डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...