आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिअर शॉपी असल्याचा खोटा बोर्ड लावून दोघांनी मिळून खुलेआम बिअर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळताच त्यांनी छापा मारुन कारवाई केली. याप्रकरणी अजय बाबासाहेब पवार या रंगेहाथ पकडले, तर मुळ मालक बाबासाहेब केशव पवार, संतोष त्रिभुवन फरार झाले.
१ जानेवारी रोजी विभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली होती. विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्या सूचनेवरून उपअधीक्षक प्रदीप पोटे, संजय तवसाळकर, निरीक्षक आर. के. गुरव यांच्या पथकाने सोलापूर-धुळे महामार्गावरील साजापूर शिवारात हॉटेल मराठाच्या बाजूला असलेल्या या बनावट बारवर धाड टाकली. तेव्हा ग्रीन बिअर शॉपी नावाने बोर्ड लावून आरोपींनी बिअर विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यांनी बाबासाहेब पवार यांच्या नावाने बिअर विक्रीचा बनावट परवाना तयार करुन तसा बोर्डदेखील लावला. निरीक्षक विजय रोकडे, जी. बी. इंगळे, बी. आर. वाघमोडे, ए. ई. तातळे, प्रदीप मोहिते, श्रीमंत बोरुडे यांनी कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.