आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकार सुडाच्या भावनेने विरोधकांविरुद्ध कायद्याच्या बडग्याचा दुरुपयोग करत असेल, हे शक्य आहे, पण मंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या आलिशान घरांमधून कोट्यवधी रुपये जप्त केले जातात किंवा एखाद्या बिल्डरच्या पत्नीच्या खात्यातून तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या पत्नीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात किंवा एखाद्या कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे एका रात्रीत मंत्री किंवा त्यांच्या नातेवाइकांना कोट्यवधींचा फायदा झाला तर जनता याकडे कसे पाहणार? ७० वर्षांत भ्रष्टाचाराच्या गंगेत हात धुऊन राजकारण्यांनी देश पोकळ करून टाकला आहे, मग पुढारी किंवा त्यांच्या नातेवाइकांवर पडलेल्या छाप्यात कोट्यवधींच्या संपत्तीची कागदपत्रे किंवा रोख रक्कम सापडण्याकडे समाज कसा दुर्लक्ष करेल? वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि सोशल मीडिया हे दिवसरात्र दाखवतात, त्यामुळे समाजाला राजकीय वर्गाचा विचित्र द्वेष वाटू लागला आहे आणि आरोप झाले तर ते खरेच असले पाहिजेत, असे तो मानायला लागला आहे.
अशा स्थितीत प्रामाणिक प्रतिमेच्या मानल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींच्या मंत्र्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे सापडले, तेव्हा पक्षप्रमुखांना त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. मात्र, त्यापासून त्यांनी अंतर राखले आहे. असे गंभीर आरोप प्रादेशिक पक्षांच्या जवळपास सर्वच नेत्यांवर होत आले आहेत. केवळ सरकार सुडाच्या भावनेने कारवाई करत आहे किंवा न्यायालयात ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, असे सांगून जनमताची भावना बदलता येणार नाही.अखेर एखाद्या मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा मुलगा अचानक व्यवसाय का करू लागतो किंवा त्याची पत्नी अचानक शेअर्स खरेदी का करू लागते? केंद्रात सत्तेवर असलेला पक्ष आणि त्याच्या सर्वात सक्षम नेत्याच्या प्रभावासमोर उभे राहण्यासाठी विरोधी पक्षांना स्वतःला ‘गंगेसारखे पवित्र’ करावे लागेल आणि राज्यांमध्ये सत्तेत असल्यास तिथे राज्यकारभाराचे अनुकरणीय मॉडेल सादर करावे लागेल. राजकारणात साम, दाम, दंड, भेद हे वापरले जाते, पण जनतेला न्याय आणि सुशासनाची समज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.