आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:6 पालिकांसाठी 186 सदस्यपदांची आरक्षण सोडत, उस्मानाबादमध्ये 20 प्रभागांत 21 महिलांना संधी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रभागांची आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. यात बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचे प्रभागनिहाय नगरसेवकपदाची आरक्षण सोडत सोमवारी (१३ जून) ठिकठिकाणी झाली. बीड जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी १८६ सदस्यपदांची आरक्षण सोडत झाली.

बीड शहरात सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ५२ नगरसेवकांपैकी ६ जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव सोडतीत काढण्यात आल्या आहेत. अंबाजोगाई येथे यंदाच्या निवडणुकीत एकूण १५ प्रभाग असून त्यातून ३१ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. गेवराई आरक्षण व सोडत दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यक्रम पार पडला. परळी नगरपालिकेच्या एकूण १७ प्रभागांतून ३५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यात ६ प्रभाग अनुसूचित जातींसाठी, तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहे. धारूर पालिकेत सोडतीनुसार सर्व दहा प्रभागांतील १० जागांसाठी महिला असणार आहेत. दरम्यान, उस्मानाबाद शहरातील २० प्रभागात २१ महिला नगरसेविकांना संधी मिळाली आहे. त्यात चार एससी आणि एस एसटी महिला सदस्यांना तर उर्वरित १६ महिला नगरसेविका सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवू शकणार आहे.

जालन्यात सर्वसाधारण उमेदवारांसाठी २६ जागा
जालना शहरातील नगरपालिका प्रभागांचे आरक्षण शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. नव्या आरक्षण सोडतीनुसार शहरातील एकूण ३१ प्रभागातील ६३ जागांमध्ये ८ जागा अनूसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यात चार जागा अनूसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एक जागा अनुसूचित जमातीतील उमेदवारासाठी तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी २६ तर महिलांसाठी २८ जागा राखीव ठेवण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...