आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20:औरंगाबादच्या कायापालटाची संधी ; दिव्य मराठी ‘टाॅक शाे’मध्ये संघटनांंनी केल्या सूचना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील काही मोजक्या शहरांना जी-२० परिषदेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यात औरंगाबादचा समावेश ही अनमोल ऐतिहासिक संधी आहे. एकाच जिल्ह्यात पाच मंत्री, शहराची धुरा सांभाळणारे सर्व तरुण अधिकारी हा सुवर्णयोग आणि समन्वय पुन्हा कधी जुळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे जी-२० च्या रूपाने शहराचा कायापालट करण्याची अनाेखी संधी शहराला मिळाली आहे. तिचे सोने करण्याची जबाबदारी आता औरंगाबादकरांवर आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असा निश्चय दिव्य मराठीच्या वतीने शनिवारी आयाेजित टाॅक शोमध्ये नामवंत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

टाॅक शाेमध्ये स्मार्ट सिटीचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सीएमआयचे अध्यक्ष नितीन गुप्ता, सचिव अर्पित सावे, उत्सव माच्छर, मसिआचे सचिव राहुल मोगले, दुष्यंत आठवले, क्रेडाईचे माजी उपाध्यक्ष रवी वट्टमवार, विकास चौधरी, वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशनचे वसंत वाघमारे, हर्षवर्धन जैन, हॉटेल इंडस्ट्री असोसिएशनचे हरप्रीत सिंग, सुनील चौधरी, अजिंठा वेल्फेअर असोसिएशनचे पपिंद्रपाल खनुजा, इंटॅकच्या माया वैद्य, औरंगाबाद फर्स्टचे हेमंत लांडगे, निखिल भालेराव उपस्थित होते. {सविस्तर वाचा उद्याच्या अंकात.

बातम्या आणखी आहेत...