आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी, फार्मा, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक हब असलेल्या औरंगाबादने मागील वर्षांत १५ हजार कोटींपर्यंत निर्यात केली. यंदा तर सहा महिन्यांतच निर्यातीची उलाढाल १३ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. प्रचंड निर्यात क्षमता असलेल्या मराठवाड्यात निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्यासाठी फेडरेशन ऑफ एक्स्पोर्ट असोसिएशन मार्गदर्शन करत आहे. कृषी आणि उद्योग क्षेत्रांना निर्यातीसाठी प्रेरणा देण्यासाठीच उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘फिओ’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष उद्योजक नंदकिशोर कागलीवाल यांनी दिली.
फिओ, सीएमआयए आणि स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित ‘अन्न प्रक्रिया आणि निर्यात आधारित’ उद्योग परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील कृषी आधारित आणि उद्योग क्षेत्रातील निर्यातशील उद्योगांना चालना देण्यासाठी या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
फिओ संस्थेच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक अंकित शहा म्हणाले की, आपल्या देशातील निर्यातीने आता ६६९ बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सरकारतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. एक्स्पोर्ट तज्ज्ञ विनायक टेमगिरे म्हणाले, ‘कोणत्याही उत्पादनाचे किंवा सेवांची निर्यात करताना मार्केट रिसर्च, पेमेंट सुरक्षा आणि निर्यातसंबंधी सखोल माहिती असणे आवश्यक आहे.’ सीएमआयएचे मानद सचिव अर्पित सवे, कृष्णा दास नायर, किशोर झाडे, कृषी केंद्र औरंगाबाद, एक्स्पोर्ट कन्सल्टंट विभागातील शेतकरी आणि निर्यातदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
निर्यात वाढवण्यास आमचे प्राधान्य : नितीन गुप्ता
‘सीएमआयए’चे अध्यक्ष नितीन गुप्ता म्हणाले, ‘सीएमआयएची यंदा तरुण पिढीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कामाच्या प्राधान्यक्रमात आम्ही निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. लोकल ते ग्लोबल या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी आणि उद्योग क्षेत्रातून निर्यात क्षमता असणाऱ्या उद्योगांना चालना घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.