आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद भरती:आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात मराठी, उर्दूसाठी हंगामी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार, मराठी भाषेसाठी हंगामी संपादक, वार्ताहर आदी पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वृत्तनिवेदक आणि भाषांतरकारसाठी कमाल पन्नास वयोमर्यादेपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतील. तर वार्ताहर पदासाठी २१ ते ५० अशी वयोमर्यादा आहे.

कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. उर्दूसाठी उमेदवारांचे उर्दूवर प्रभुत्व असणे अनिवार्य आहे. वार्ताहरपदासाठी वृत्तपत्राविद्या आणि जनसंवाद अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदव्युतर पदविका असावी. इंग्रजी भाषेत लिहिण्याचे कौशल्य आवश्यक आहे. वृत्तनिवेदक, भाषांतरकार पदासाठीही पदवी किंवा पदव्युत्तर पदविकेसह पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. आवाजाच्या क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व उमेदवारांना महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती असणे गरजेचे आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत शुल्काचा भरणा करून प्रसारभारती, आकाशवाणी औरंगाबाद यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढावा. त्यानंतर कार्यालय प्रमुख, आकाशवाणी, औरंगाबाद, ४३१००५ या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज टपालाद्वारे अथवा थेट पोहोच करता येईल. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/pbvacancies/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. शिवाय याच संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करता येईल. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या airnews_arngbad या ट्विटर हँडल आणि AIRAURANGABAD या फेसबुक पेजवरही सदरील माहिती उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...