आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:सांस्कृतिक राष्ट्रवादाचा डाव आखला जातोय, याचा सर्वांनी विरोध करा; विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांचे प्रतिपादन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तक्षशिला बुद्धविहार समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी केले मार्गदर्शन

संस्कृती एका रंगाची कधीच नसते. भारतीय संस्कृती वेगवेगळे लोक, त्यांच्या भाषा, असंख्य रंगांनी एकत्र आलेली आहे. परंतु आज तिला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या एकरंगी रंगात रंगवण्याचा डाव आखला जातो आहे. त्याचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी गणेश विसपुते यांनी केले.

विसपुते यांची विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तक्षशिला बुद्ध विहार समितीतर्फे त्यांच्या रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असाराम गायकवाड, के. ई. हरिदास, भीमराव सरवदे, प्रा. भारत सिरसाट, किशोर ढमाले, अनंत भवरे, अरविंद अवसरमोल, देविदास येवले, प्रतिमा परदेसी यांची उपस्थिती होती.

विसपुते म्हणाले, मला घडविण्यात औरंगाबादचाही मोठा वाटा आहे. वेगवेगळे विचार असलेल्या लोकांच्या पाण्याची खनिजे इथूनच आपल्यात भिनली. उर्दू शिकलो. वली औरंगाबाद, साहिर लुधयानवी, बशर नवाज यांचे मुशायरे ऐकले आहेत. भारतीय संस्कृती ही प्राचीन, सहमती सांगणारी आहे. सहमती नसती तर विविध धर्म आलेच नसते. परंतु संस्कृतीचे सौंदर्य नष्ट करण्याचा डाव आखला जातो आहे. महिला, दलित, पत्रकार, लेखक यांच्यावर हल्ले होत आहेत. हिंसक, अन्यायी, एकरंगी राष्ट्रवाद करून पाहत आहेत. असत्याला सत्याने दिलेले आव्हान म्हणजे विद्रोह आहे. या सत्यासाठी उभे राहण्याची गरज असल्याचेही विसपुते म्हणाले.

वैचारिक बांधिलकी, निष्ठा नसल्याने संघर्ष अटळ : हरिदास
के. ई. हरिदास यांनी वैचारिक बांधिलकी, निष्ठा नसल्याने संघर्ष अटळ असल्याचे सांगितले. माणूस घडवून दिशा देण्याचे आणि जाणीव, जागृती करण्याचे काम करण्याची गरज आहे. यासाठी साहित्यापासून मुले दूर जाणार नाही. फुले-आंबेडकर मुळातून वाचा, असा संदेश लुलेकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...