आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक विषयावर राजकारण:महाराष्ट्र, गुजरातच्या बेपत्ता मुलींवर चित्रपट काढावा, विरोधी पक्षनेते दानवे यांचा भाजपला सल्ला

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुका येतात तेव्हाच भाजप हिजाब प्रकरण काढतो, द कश्मीर फाइल्स आणि द केरला स्टोरी असे चित्रपट प्रदर्शित केले जातात, धार्मिक विषयावर राजकारण केले जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

भाजपला महिलांची काळजी असेल तर मागील पाच वर्षांत गुजरातमधून ४० हजारांवर महिला-मुली बेपत्ता झाल्या आहेत, महाराष्ट्रातून १८ ते २५ वयाच्या सरासरी ७० मुली रोज बेपत्ता होत आहेत, त्यावर त्यांनी चित्रपट काढावा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, ११ मे रोजी नितीन बानगुडे पाटील यांचे नक्षत्रवाडी व बजाजनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना ‘गरुडझेप’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.

२५ ठिकाणी व्याख्याने

१४ मे रोजी सकाळी १० वाजता टीव्ही सेंटर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, सायंकाळी ५ वाजता शरद हॉटेल ते संभाजी महाराज पुतळा यादरम्यान शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणण्याच्या उद्देशातून २५ प्रशिक्षित व्याख्याते २५ ठिकाणी खरा इतिहास सांगणार आहेत.