आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची प्रतिमा, कर्तृत्व लोकांच्या मनातून पुसण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही.बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सब कुछ 'कमल'साठी हा आटापिटा आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, बाळासाहेबांचा बाबरीशी संबंध नाही सांगणारे, आमचे संपूर्ण केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ पानिपतच्या लढाईत लढले होते, असे सांगेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
अंबादास दानवेंचे टविट काय?
अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 1992 साली बालवाडीत शिकणारे आज सांगतात आम्ही कारसेवेत होतो. थोड्या दिवसाने भाजप हे पण सांगेल की आमचे संपूर्ण केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळ पानिपतच्या लढाईत लढले होते. खोटेपणाची, अपमानित करण्याची हद्दच झाली.. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर (2012) त्यांची प्रतिमा, कर्तृत्व लोकांच्या मनातून पुसण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. 2014 साली शिवसेनेशी युती तोडणे हा त्याच खेळीचा भाग होता. बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सब कुछ 'कमल'साठी हा आटापिटा आहे.
ही कृतघ्नता लोकांना खपणारी नाही
अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मग ज्या संघटना बाबरी पतनात होत्या, त्या संघटनांच्या नेत्यांनी जबाबदारी घेण्याऐवजी बिळात शिरून बसणे का पसंत केले? यांना बाळासाहेब हवे आहेत, पण यांच्या आवश्यक तेवढेच...ही कृतघ्नता लोकांना खपणारी नाही. मुळात चंद्रकांत पाटील यांच्याससरखे माणसे सरकारात असताच कामा नाहीत. मिंधे गट यावर आता काय बोलणार. की आता सगळे बोटे चेपले आहेत? सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आम्हाला म्हणता, तुम्ही तर चक्क बाळासाहेब सोडले! जनता हिशेब करेलच.. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.