आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळा लागताच शहरातील पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले. त्यात राजकीय पक्षही उतरले. भाजप आणि मनसेने जोरदार आंदोलन करत मनपावर धडक मोर्चाची तयारी सुरु केली आहे. २३ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पाणी समस्येवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर शनिवारपासून मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरु होणार आहे. त्यापूर्वीच शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी ४०५० वरून २००० रुपये करण्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेत्यांनी मोर्चा काढण्याऐवजी पाणी वाढवण्यासाठी होणारे काम पहावे, असा टोला त्यांनी लगावला.
देसाई म्हणाले की, शहरातील प्रशासन चांगले काम करत आहे, पाण्यासंदर्भात प्रामाणिक काम सुरु आहे, फडणवीस यांनी माहिती घ्यावी. अधिकाऱ्यांनीही त्यांना पाणीपुरवठ्याबद्दल माहिती द्यावी. मनपाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करत आहे.
असा आरोप स्थानिक शिवसेना नेते करतात, असे निदर्शनास आणून दिले असता थेट भाष्य करणे टाळत देसाई म्हणाले की, जलकुंभावर आंदोलन करणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासक, मनपा अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.