आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनात शाळा:शाळा सुरू करण्यास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचा विरोध; लस येईपर्यंत शाळा सुरू न करण्याची मागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सर्व शाळांचे निर्जंतूकीकरण करणे, शिक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे बंधनकारक

देशभरात दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही राज्यात रुग्ण संख्या वाढते आहेत. काही राज्यांनी अद्यापही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर हरियाणात शाळा सुरु झाल्यावर रुग्ण आढळून आल्यावर शाळा सुरु ठेवण्याबाबत पुनर्विचार केला जात आहे. अशा परिस्थितीत २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा लस येईपर्यंत सुरु करण्यात येवू नयेत. अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनाद्वारे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे.

संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनलॉक झाल्यावर सर्व क्षेत्र खुली करण्यात आली आहेत. परंतु कोरोनाचे सावट अद्यापही गेलेले नाही. तसेच त्यावर अजून लस आलेली नाही. अशातच राज्य शासनाने २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व शाळांचे निर्जंतूकीकरण करणे, शिक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु कोरोना चाचणीसाठीचे नियोजन करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसणे, त्याचबरोबर शेजारील उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यात शाळा सुरु केल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थींना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात येता आपण अधिच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच सध्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा देखील सुरु झाल्या आहेत. तेंव्हा खबरदारी म्हणून निर्णयाचा पुर्नविचार करत लस उपलब्ध झाल्यावरच शाळा सुरु कराव्यात असे उर्दू शिक्षक संघाने म्हटले आहे. या निवेदनावर संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद, महेबुब तांबोळी, नाहीद खातून आदींची नावे आणि स्वाक्षऱ्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करत दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेस सुरुवात. परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपूर्वी थर्मल गण द्वारे तपासणी करण्यात आली.अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या पाहता यंदा पुरवणी परीक्षेला परीक्षार्थी कमी बसले आहेत दुपारच्या सत्रात उर्दू विषयाच्या पेपरला काही केंद्रात एक ते दोनच विद्यार्थी पेपरला होते.

बातम्या आणखी आहेत...