आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; अपत्य झाल्यानंतर लग्नास नकार, तरुणावर गुन्हा दाखल

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडिता प्रसूतीसाठी गेल्यानंतर आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत विवाह उरकून घेतला

हिंगोली शहरात एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून सदर महिलेस मूल झाल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. त्यामुळे त्या महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी, ता. २३ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून त्या तरुणास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील एक महिला खासगी दवाखान्यात कामाला होती. त्या ठिकाणी लोहरा (ता. हिंगोली) येथील केशव दत्ता धाडवे (३०) हा तरुण देखील कामाला होता. त्या ठिकाणी दोघांचे सूत जुळले.

त्यानंतर वर्ष २०१४ पासून त्याने त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. या काळात त्या महिलेस शासकीय नोकरी देखील लागली आहे. त्यानंतरही त्याने महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. यामध्ये सदर महिला गरोदर राहिली. ती महिला प्रसूतीसाठी गेल्यानंतर केशव धाडवे याने दुसऱ्याच मुलीसोबत विवाह उरकून घेतला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने शुक्रवारी, ता. २३ रात्री उशिरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामध्ये केशव धाडवे याने लग्नास नकार देत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

यावरून पोलिसांनी केशव धाडवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने त्या तरुणास अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...