आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत १८ ते २१ मार्चदरम्यान पावसाची शक्यता आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. कुलाबा वेधशाळेने आठ जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
जिल्हानिहाय अलर्ट
यलो अलर्ट (२.५ ते १५.५ मिमी पावसाची शक्यता) : कोकण गोवा विभाग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.