आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक क्रिकेट चषक स्पर्धा:प्रणवच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑर्चिड इंग्लिश स्कूलचा विजय, पीएसबीए संघ पराभूत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणव बल्लालच्या (73 धावा, 2 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑर्चिड इंग्लिश स्कूलने विजय मिळवला. या सामन्यात ऑर्चिडने पीएसबीए स्कूल ब संघावर 85 धावांनी मात केली. प्रणव बल्लाल सामनावीर ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑर्चिडने 15 षटकांत 7 बाद 139 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अनुप राऊत अवघ्या एका धावेवर बाद झाला. दुसरा सलामीवीर ऋषिकेश पवारदेखील 10 धावा करु शकला.

राेहित पुरी एका धावेवर परतला. एकवेळ संघ 26 धावांत 3 बाद असा संकटात असताना कर्णधार प्रवण बल्लालने सर्व सुत्र आपल्या हाती घेतले. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रवणने 49 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार खेचत 73 धावांची खेळी करत संघाला शंभरी गाठून दिली. त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. इतर फलंदाजी दुहेरीचा आकाडाही गाठू शकले नाहीत. विशाल मेहर भाेपळाही फोडू शकला नाही. अनंत झुंबड 1, प्रतिक सपकाळ 7, रोहन मुरकुटे 7 हे फलंदाज आल्यापावली परतले. अलिम 1 धावांवर नाबाद राहिला. पीएसबीएकडून अद्वैत उन्हाळेने 24 धावांत 3 गडी बाद केले. ज्ञानेश पाटीलने 15 धावांत 2 बळी घेतले. दिग्विज देशमुख व पार्थ दळवीने प्रत्येकी एकाला टिपले.

प्रणवची अष्टपैलू कामगिरी

प्रत्युत्तरात पीएसबीए स्कूलचा डाव 12.1 षटकांत अवघ्या 54 धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या प्रवण बल्लालने गोलंदाजीत ही कमाल कामगिरी केली. पीएसबीएच्या कैवल्यच्या 10 धावा वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धाव संख्या काढता आली नाही. कर्णधार कौवल्य चौधरी अवघ्या एका धावेवर असताना अलिमने त्याचा त्रिफळा उडवला. ऑर्चिडकडून पियुष म्हस्केने 11 धावा देत 3 गडी बाद केले. प्रणव बल्लालने 8 धावांत 2 आणि अलिमने 8 धावा देत 2 बळी घेतले. रोहन मुरकुटे व प्रतिक सपकाळने प्रत्येकी एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...