आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामात टाळाटाळ:पूर्वसूचना न देता बैठकीलाही गैरहजर, तहसीलदारांच्या निर्देशानंतर चौघांवर गुन्हा

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये चार बिएलओवर निवडणूक कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तहसीलदार ज्योती पवार यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार यादी तयार करणे, अद्यावत करणे, आधार जोडणी करणे आदी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याने चार कनिष्ठ लिपिकांवर निवडणूक कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे औरंगाबाद तहसीलदार कार्यालयाने कळविले आहे.

मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम निवडणूक विभागाच्या वतीने सुरू आहे. त्यामध्ये बी.एल ओ घरोघरी जाऊन मतदाराचे आधार कार्ड लिंक करत आहेत. तसेच मतदारांना त्याबाबत माहिती देत आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम राबविण्यात येत आहे.

चार जणांवर झाली कारवाई

कडा परिसरातील पाटबंधारे विभागाच्या संशोधन विभागातील व्ही. व्ही. जाधव, पद्मपुऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागातील पी.बी.दुधे, सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिन रेवले आणि डी.एस.जारवाल या बीएलओंनी निवडणूक कामात टाळाटाळ केल्याने लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वतंत्र बीएलओ नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीला आधार क्रमांक जोडण्याबाबत, 01 जानेवारी 2023 च्या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वतंत्र बीएलओ नेमण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जाधव, दुधे, रेवले व जारवाल यांचे नियुक्ती आदेश तहसील कार्यालयाने तामिल केले. त्यांना नियुक्तीबाबत कल्पना दिली.

बैठकीत कामकाजाबाबत सूचना केल्या. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता ते बैठकीस गैरहजर राहिले. शिवाय त्यांनी बीएलओचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यानंतर ही त्यांनी कामकाज सुरू न केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...