आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका दाखल:वैद्यकीय शिक्षणासाठी 2 दिव्यांग विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्याचे आदेश

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) उत्तीर्ण दिव्यांग २ विद्यार्थ्यांना संबंंधित महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षणासाठी दिव्यांग काेट्यातून पात्र ठरवण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठातील सुटीकालीन न्या. किशाेर संत यांनी शुक्रवारी दिला. या प्रकरणात दिव्यांग अस्मिता साेनटक्के व सय्यद बिलाल मन्सूर यांनी अनुक्रमे अॅड. संताेष डांबे व अॅड. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

दाेन्ही याचिकांवर सुनावणी झाली. याचिकांनुसार बिलालला नीट उत्तीर्ण झाल्यानंतर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला हाेता. मात्र, एका हाताला बाेटे नसल्याच्या कारणावरून त्याला मुंबईच्या वैद्यकीय कमिटीकडून प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे बिलालने अॅड. ठाेंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. यापूर्वी दिव्यांग अजिंक्य बुदलेलाही प्रवेश नाकारला हाेता. त्याला अंतरिम आदेशाद्वारे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरवण्याचा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याआधारे अस्मिता साेनटक्के व सय्यद बिलाल यांनाही अंतरिम आदेशाद्वारे दिलासा मिळाला आहे. यावर पुढील सुनावणी २८ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. या प्रकरणात केंद्राकडून भूषण कुलकर्णी यांनी तर शासनाकडून अॅड. एस. पी. साेनपावले यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...