आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकमी-जास्त विद्युत दाबामुळे सिल्लोड शहरातील नागरिकांची उपकरणे जळाली. यासंबंधी महावितरणकडे दाद मागूनही दखल घेतली गेली नाही. उपकरणे जळालेल्या नागरिकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागितली. यावर शहरातील सात ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी व सदस्या संध्या बारलिंगे यांनी दिले.
सिल्लोड शहरातील शास्त्रीनगर येथे राहणारे सौरभ गोविंद आंबट, विमलबाई शंकरलाल शंकरपेल्ली, विजयलक्ष्मी काशीनाथ आंबट, अंजली मारुती पाटील, गणेश शंकरलाल शंकरपेल्ली, अताउल्ला खान अब्दुल्ला खान आणि उषाबाई पंडितराव कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली होती. महावितरणने विद्युत निरीक्षकांमार्फत अहवाल मागवला होता. त्यानुसार भरपाई देण्यास जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. महावितरणने सेवेत त्रुटी देऊन सदोष विद्युत पुरवठा केल्याने ग्राहकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरले आहे. ग्राहकांच्या वतीने अॅड. आनंद मामीडवार यांनी बाजू मांडली. महावितरणच्या वतीने अॅड. अनिल भुतेकर यांनी युक्तिवाद केला.
लेखी तक्रारकडेही दुर्लक्ष महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता सिल्लोड आणि मुख्य कार्यकारी अभियंता कन्नड विभाग यांना प्रतिवादी करून भरपाई द्यावी, अशी विनंती केली होती. विद्युत दाबात चढ-उतार आल्याने उपकरणे जळाली असल्याची कल्पना ५ ऑक्टोबर २०१९ ला ग्राहकांच्या वतीने देण्यात आली होती. यासंबंधी लेखी स्वरूपात तक्रारही केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.