आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:केंद्राला शिष्यवृत्ती जमा करण्याचे आदेश

औरंगाबाद |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद | याचिकाकर्त्या संस्थांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची किती रक्कम शिल्लक आहे ते केंद्र शासनास एका आठवड्यात कळवावे, त्यानंतर केंद्र शासनाने त्यांचा ६० टक्के हिस्सा ३ आठवड्यांत जमा करावा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी दिले. पोर्टलवरील माहितीबाबत (डेटा) काही त्रुटी असल्यास राज्य आणि केंद्र शासनाने संयुक्त बैठक घेऊन त्या दूर कराव्यात, असेही स्पष्ट केले. याचिकेवर ४ जुलैला पुढील सुनावणी आहे. सुनावणीदरम्यान राज्य शासनाने शपथपत्राद्वारे स्पष्ट केले की, प्रणालीत काही त्रुटी होत्या, त्या दूर केल्या आहेत. राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा दोन आठवड्यांत पोर्टलवर जमा होण्यास सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...