आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेला दिलासा:ओम प्राथमिक शाळेचे सील उघडण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, 25 लाख जमा करण्याचे निर्देश

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ओम प्राथमिक शाळेचे सील उगडण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. सिडकोने शाळेला अद्याप जागा हस्तांतरित न केली नाही, असा दावा करत सिडको प्रशासनाने १९ मे २०२२ रोजी ओम प्राथमिक शाळेला सील बंद केले होते.

शाळेतील शिक्षकांनी सिडको प्रशासनाला शाळेचे सील उगडण्याची वारंवार विनंती केली होती. परंतू, सिडको प्रशासनाने सील उगडले नाही. शाळेमध्ये ३२५ विद्यार्थी पहिली ते सातवीत शिक्षण घेत आहे. १३ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शाळेने उच्च न्यायालयात धाव घेतली व अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्या वतीने रिट याचिका दाखल केली. त्यावर ७ जून २०२१ रोजी सुनावणी झाली. ओम प्राथमिक शाळा गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून चालू आहे. शाळा परिसरातील विद्यार्थांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचे काम करते. शाळा सुरु केली नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा युक्तिवाद शाळेचा वतीने करण्यात आला.

शाळेला सिडकोचा प्लॉट हस्तांतर झालेला नाही व सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून शाळा चालू आहे, असे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर खंडपीठाने शाळेला 25 लाख रुपयांची थकीत रक्कम सिडको प्रशासनाकडे चार आठवड्यांचा कालावधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. सिडकोचा जागेचा अनधिकृत वापर व हस्तांतर संदर्भातील रक्कम शाळेला दोन आठवड्यात कळविण्याचे निर्देशदेखील सिडकोला दिले. राज्य शासनाने देखील या संदर्भात चौकशी हवाल दाखल करावा, सिडको व राज्य शासनाने आपले शपथपत्र तीन आठवड्यात दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

बातम्या आणखी आहेत...