आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा उपक्रम:शाळांमध्ये "अम्मा की रसोई- आजीचे स्वयंपाकगृह "चे आयोजन; विद्यार्थी-पालकांना पोषण मूल्यांची ओळख करून द्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोषण माह अंतर्गत शाळांमध्ये विविध स्पर्धा, कार्यक्रमांसह अम्मा की रसोई-आजीचे स्वयंपाकगृह उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शाळांमध्ये उपलब्ध धान्यापासून पारंपरिक पाककृतींची यादी तयार करून पोषण मूल्यांची ओळख करून देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाचे सचिव इंदिवर पाण्डेय यांचे व राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पत्रान्वये राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचा मुख्य उद्देश मुलांमध्ये आणि पालकांमध्ये पोषण आहाराविषयी जनजागृती करणे आणि स्थानिक ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या धान्यातून पारंपारिक पाककृती तसेच पोषण मुल्यांची ओळख करुन देणे आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

वाढती स्पर्धा, बदललेली जीवनशैली यामुळे सर्वांमध्ये फास्टफुड, जंकफुड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ज्या वयात जी पोषणमूल्य असलेले खाद्यपदार्थ, जेवण आवश्यक आहे. ते मिळत नाही. परिणामी त्या त्या वयात ज्या पद्धतीने वजन आणि आरोग्य असायला हवे त्याचे परिणाम मुलांवर दिसतात. त्यामुळे सप्टेंबर हा पोषण माह म्हणून राबवण्यात येत आहे.

यात किशोरवयीन मुलींमध्ये पोषणमूल्य तसेच आरोग्य विषयी जनजागृती करणे, पोषण मूल्यांबाबत प्रत्येक शाळा स्तरावर ऑडिओ-व्हिडिओ सत्र तसेच चर्चासत्राचे आयोजन करणे,विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व रुजवणे, पोषण माह अंतर्गत महिला आणि स्वास्थचा प्रचार-प्रसार करायचा आहे. तसेच सर्व जिल्हयांमध्ये अ‍ॅनिमिया शिबिराचे देखील आयोजन करायचे असून, विद्यार्थ्यांचे वाढ मोजमाप करायची आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर यांना सहभागी करुन घ्यायचे आहे. याबरोबरच इंद्रधनुष्य थाळी, त्रिरंगी थाळी, गणपती बाप्पा पोषक थाळी सेट, चित्रकला, रांगोळी अशा स्पर्धांच्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्याच्या आदेशात म्हटले आहे.

अम्मा की रसोई- आजीचे स्वयंपाकगृहचे आकर्षण

आधुनिक काळात झटपट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी ओहन, मिक्स, गॅस यांचा वापर वाढला. कंटाळा आला की फास्ट फुड, जंकफुड आलं. या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्याचे आरोग्यावर विपरित परिणामही होत आहे. या सर्वांमध्ये पुन्हा जुन्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. हे निसर्ग आणि जुन्या जाणकारांनी शिकवले आहे. त्या उद्देशानेच अम्मा की रसोई आणि आजीचे स्वयंपाकगृहचे आयोजन करण्यात आले असावे. ज्यात चुलीवर होणारा स्वयंपाक, मातीच्या, पंचधातूच्या भांड्यांचा वापर, सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या, पाटा वरवंटा, कडधान्य, मोड आलेले धान्य यामुळे शरीराला मिळणारे पोषक तत्व हे आजीबाईच्या बटव्यातूनच मिळू शकते. यामुळे आजही याचे महत्त्व कायम आहे. असे आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितले. या सर्वांची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...