आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळशास्त्री जांभेकर जयंती:खुलताबाद पत्रकार संघातर्फे दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद येथील पत्रकार संघाच्या वतीने ‘दर्पण दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह प्रांगणात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी दिव्य मराठीच्या डेप्युटी एडिटर दीप्ती राऊत असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील उपस्थित राहणार आहेत.

या वेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पाेलिस निरीक्षक भुजंग हातमोडे, उर्दू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहंमद अय्युब, कोहिनूर शिक्षण संस्थेचे मजहर खान, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, विजयेंद्र काबरा महाविद्यालयाचे सचिव डॉ. सतीश सुराणा यांची प्रमुख उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...