आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनानंतर दोन वर्षांनी औरंगाबाद चेस अकादमीतर्फे 9 वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे 17 ते 20 जूनदरम्यान औरंगाबादेतील कलश मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मुलींचा गट आणि ओपन गट अशा दोन प्रकारात स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी 105 खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला आहे.
दोन दिवसांत आणखी खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेचे सहसचिव हेमेंद्र पटेल व आयोजक अमरीश जोशी यांनी दिली.ही स्पर्धा महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना व औरंगाबाद जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या मान्यतेने होत आहे.
दोन प्रकारांत स्पर्धा
स्पर्धेत मुलींचा गट आणि ओपन गट अशा दोन प्रकारात स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी 105 खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला आहे. दोन दिवसांत आणखी खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेचे सहसचिव हेमेंद्र पटेल व आयोजक अमरीश जोशी यांनी दिली. कोरोनामुळे दोन वर्षांत नवे बाल खेळाडू तयार झाले नाहीत. त्यामुळे या बाल खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत 20 जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धा पुढे
तीन दिवसीय स्पर्धेत दररोज 2 फेऱ्या खेळवल्या जातील, तर एकूण 8 फेऱ्या होतील. विजेत्या खेळाडूंना एकूण 20 हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, पदक व प्रमाणपत्रदेखील दिले जाईल. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असल्याने त्याचा नवीन कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
या खेळाडूंत टक्कर
या स्पर्धेत देशातील अव्वल खेळाडू 1397 सर्वाधिक रेटिंग असलेला पुण्याचा अविरत चव्हाण व 1300 रेटिंगचा आदित्य जोशी, मुंबई उपनगराचा विहान अग्रवालसह मुलींमध्ये 1141 रेटिंग असलेली नागपूरची वेदिका पाल विजेतेपदाचे दावेदार आहेत. त्याचबरोबर यजमान औरंगाबादकडून नुकतीच राज्य स्पर्धा गाजवणारी भुमिका वागले व भक्ती गवळी आणि मुलांमध्ये अथर्व तुपे, श्रेयस नलावडे हे खेळाडू आपले आव्हान ठेवतील. औरंगाबादला पदक मिळवण्याची अपेक्षा असल्याचे हेमेंद्र पटेल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.