आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार अर्ज:विभागीय लोकशाही दिनाचे 10 एप्रिल रोजी आयोजन

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिन होणार आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे. विहित नमुना अर्ज आवक शाखेत उपलब्ध करून दिला आहे.

विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतपूर्व अर्ज विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापूर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाहीदिनी तक्रार अर्ज दिले असतील, परंतु त्यांचे प्रकरणात कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात पुन्हा अर्ज देता येणार नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे कळवले आहे.