आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याची काळजी घेण्याची सवय:पर्यटन विकास महामंडळातर्फे हुरडा महोत्सवाचे आयोजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. त्यानिमित्त राज्य पर्यटन विकास महामंडळात (एमटीडीसी) दोन दिवसांचा हुरडा महोत्सव झाला. या महोत्सवात तृणधान्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. तृणधान्याच्या वापरामुळे आरोग्याची काळजी घेण्याची सवय लागेल, असे मत एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी व्यक्त केले. एमटीडीसीच्या उपाहारगृहांमध्ये पौष्टिक तृणधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या तृणधान्यांचा समावेश आहे. एमटीडीसीच्या औरंगाबाद, फर्दापूर, ग्रेपपार्क नाशिक, तारकर्ली येथे तृणधान्यनिर्मित पदार्थ स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...