आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:जैविक संसाधन’वर आजपासून विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या हिरक महोत्सवानिमित्त ‘जैविक संसाधन’ विषयावर ७, ८ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण यांनी गुरूवारी दिली. राष्ट्रीय परिषदेत ‘जैविक संसाधन’ विषयक विविध सत्र होणार अाहे. यात २१८ शोधनिबंध सादर होणार आहेत. परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता कुलगुरू प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यासाठी प्रा.ए.के. पांडे ( कुलगुरू, भोपाळ), प्रा. जनार्धनन हे उपस्थित राहणार आहेत. या वेळी विभागातील माजी प्राध्यापकांचा त्यांच्या योगदानानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. चर्चासत्रासाठी देशभरातून २१८ शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या चर्चासत्रासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मिलिंद सरदेसाई, डॉ. सुदीप रॉय, डॉ. किरण कुमार, डॉ. भगवान साखळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...