आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवी संमेलन:स्मृतीशेष कवी सुधाकर भुईगळ स्‍मृतीदिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय कवी संमेलनाचे आयोजन

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधाकर भुईगळ प्रतिष्‍ठाण, औरंगाबाद यांच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. 25 नोव्‍हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्‍या मुख्‍य नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार आहे.

स्मृतीशेष कवी सुधाकर भुईगळ यांच्‍या 33 व्‍या स्‍मृतीदिनाचे औचित्‍य साधून प्रतिष्‍ठाणच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.

प्रस्‍तुत कवी संमेलनामध्‍ये नारायण पुरी, भरत दौंडकर, नितीन देशमुख, र‍वी केसकर, अरुण पवार, सुनील उबाळे, चरण जाधव, अविनाश भारती, देवानंद पवार हे आपल्‍या कविता सादर करणार आहेत. काव्‍य रसिकांनी या काव्‍य मैफिलीचा लाभ घेण्‍याचे आवाहन प्रतिष्‍ठाणच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...