आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत देश आर्थिक घडामोडी:आखाती देशांकडून प्रतिमा सुधारण्यासाठी मोठ्या खेळांचे आयोजन; परदेशी संघांचीही हाेतेय खरेदी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मरियम अल अनेजीला वर्षानुवर्षे असे वाटले की लोकांना तिचा देश, कतारबद्दल माहिती नाही. लोकांना सांगायची की ती दुबईजवळ राहते. आता जेव्हा लोक विश्वचषक फुटबॉलसाठी पोहोचत आहेत, तेव्हा त्या राजधानी दोहाच्या रस्त्यावर भारत, युरोपमधील अनोळखी लोकांचे स्वागत करतात. देशाच्या नव्या जागतिक ओळखीचा ितला अभिमान आहे. लोक आता दोहा ओळखतात, ३५ वर्षीय अल अनेजी सांगतात. गेल्या काही दशकांमध्ये, कतार आणि आखाती देशांनी प्रभाव वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन, संघ खरेदी आणि प्रायोजकत्वावर अब्जावधी रुपये खर्च केले. अर्थव्यवस्थेत विविधता, पर्यटन वाढवणे आणि परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादाची भावना रुजवून त्यांना देशातील हुकूमशाही राजवट कायदेशीर ठरवायची आहे.

सौदी अरेबियाने या वर्षी अमेरिकेच्या पीजीए लीगशी स्पर्धा करत नवीन गोल्फ स्पर्धा सुरू केली. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबीने गेल्या महिन्यात एनबीए प्री-सीझन गेम्सचे आयोजन केले होते. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतारच्या राजघराण्यातील सदस्य आणि सरकारी संस्थांनी परदेशी फुटबॉल संघ विकत घेतले आहेत. यामध्ये सौदी सॉवरेन वेल्थ फंडने गेल्या वर्षी न्यूकॅसल युनायटेड संघाची खरेदी केली होती. कतारमध्ये रविवारपासून सुरू होणारा विश्वचषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये आखाती देशांच्या मोहिमेतील सर्वाेच्च बिंदू आहे.

समीक्षकांचा आरोप आहे की मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप पुसण्यासाठी व आंतरराष्ट्रीय प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आखाती देश खेळांचा वापर करत आहेत. तथापि, खेळांचे आयोजन हे परदेशात चांगली प्रतिमा निर्माण करण्यापेक्षाही माेठे आहे. सौदी अरेबिया तेलावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला आकार देत आहे. खेळामुळे नोकऱ्या निर्माण होतात आणि ग्राहकांचा खर्च वाढतो. मुलांमधील लठ्ठपणा व मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी आखाती देशांतील आरोग्य तज्ञांना खेळांना प्रोत्साहन द्यायचे आहे. जागतिक फुटबॉल संघ खरेदी करणे हा अब्जाधीश राजेशहांसाठी स्टेटस सिम्बॉल आहे. फुटबॉल लोकप्रिय आहे म्हणूनच राज्यकर्ते याला आपली प्रतिष्ठा आणि क्षमता वाढवण्याचे साधन मानतात. स्कीमा बिझनेस स्कूल, पॅरिसमधील क्रीडा आणि भू-राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक सायमन चॅडविक म्हणतात की, कतारने स्वतःला सुरक्षित, संबंधित ठेवण्यासाठी व वैधता मिळविण्यासाठी विश्वचषक आयोजित केला आहे.

राजकारण व खेळांवर लिहिणारे कतारी विद्वान अब्दुल्ला अल एरियन यांच्या मते, फुटबॉलचा वापर शंभर वर्षांत अरब देश, उत्तर आफ्रिकेतील राष्ट्रवादी चळवळी आणि हुकूमशाही सरकारांनी एक साधन म्हणून केला. ज्या देशांत नागरी समाज गट, राजकीय पक्षांवर बंदी आहे, तेथे खेळाने विराेध आणि राजकीय जागृतीला आवाज दिला. चाहत्यांच्या गटांनी अल्जेरिया आणि इजिप्तमधील क्रांतिकारी चळवळींमध्ये, गर्दी जमवणे आणि पोलिस आणि सैन्याचा सामना करणे यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कतारमध्ये विश्वचषकाने मोठा बदल केला आहे. दोहा शहरातील पारंपारिक बाजारपेठेत आता उत्सव दिसून येताे. हॉर्न वाजवणारे तरुण फुटबॉल जर्सी घालून गर्दीतून फिरत आहेत.

पायाभूत सुविधांवर 16 लाख कोटींहून अधिक खर्च १२ वर्षांपूर्वी कतारने जगात ठसा उमटवण्यासाठी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी दावेदारी केली हाेती. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा, अमेरिकन लष्करी तळ आणि अल-जझीरा न्यूज नेटवर्कमुळे त्याचा प्रभाव जगात वाढला आहे. अधिकाऱ्यांना आशा आहे की विश्वचषक स्पर्धेमुळे कतारला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या मोठ्या शेजारी देशांव्यतिरिक्त एक वेगळा देश म्हणून स्वत:ला प्रस्थापित करता येईल. विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्यानंतर, कतारने राजधानीचे बांधकाम, फुटबॉल स्टेडियम, महामार्गांचे जाळे,नवीन मेट्रो यावर १६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.

बातम्या आणखी आहेत...