आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Organizing The First Greeting Chariot Yatra From Matkirtha Sindkhedraja To Pachad On The Occasion Of Rajmata Jijau's Memorial Day; Arrival At Kranti Chowk On 15th June

राजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन:मातृतिर्थ सिंदखेडराजा ते पाचाड पहिल्या अभिवादन रथ यात्रेचे आयोजन; 15 जून रोजी क्रांती चौकात होणार आगमन

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता जिजाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त मातृतिर्थ सिंदखेडराज ते समाधी स्थळ पाचाड रायगड पहिली अभिवादन यात्रा काढली जाणार आहे. 15 जून रोजी दुपारी 3 वाजता अभिवादन यात्रेचे औरंगाबादेतील क्रांती चौकात आगमन होईल. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंब्रीजपासूनच रथ यात्रेचे जंगी स्वागत केले जाणार आहे. तसेच शिव मावळे यात्रेत सहभागी होतील.

राजमाता जिजाऊंचा 17 जून स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्म स्थळापासून 15 जून रोजी सकाळी 9.30 वाजता अभिवादन रथ यात्रेला सुरुवात होईल. जालना, बदनापुर, औरंगाबाद, नेवासा, घोडेगाव, अहमदनगर मार्गे सुपा येथे मुक्कामी राहिल. 16 जून रोजी सकाळी सुपा येथुन शिखरापूर, लोणीकंद, वाघोली येथे स्व.पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून महाड, लाडवली येथील नवयुग विद्यापीठात मुक्कामी थांबेल. 17 जून रोजी सकाळी 9.30 वाजता पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीचे सिंदखेडराजा येथील लखुजीराजे यांच्या राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून विधीवत पुजन केले जाणार आहे. या अभिवादन यात्रेत शिव मावळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, रविराज बोचरे पाटील यांनी केले आहे.

बैठकीत सर्वानुमते निर्णय

सिंदखेडराजा येथे 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता जिजामाता कन्या विद्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत राजमाता जिजाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे जन्म स्थळ ते समाधी स्थळ पहिली अभिवादन यात्रा काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या बैठकीला औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक तथ आयोजक विजय काकडे पाटील, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, आत्माराम शिंदे, रविराज बोचरे, अॅड. सुवर्णा मोहिते, अरूण कदम, बिजून राऊत, विश्वजीत कुबेर, पवन राऊत आदींची उपस्थिती होती.

येथे होणार स्वागत

जालना, बदनापुर, शेकटा, करमाड, केंब्रीज, चिकलठाणा, मुकूंदवाडी, क्रांती चौक, पंढरपुर, वाळूज, कायगाव टोका येथे जिजाऊ अभिवादन रथ यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. तसेच यात्रेत शिव मावळे सहभागी होऊन पुढे पाचोडला रवाना होतील.

17 जून जिजाऊंचा स्मृतीदिन

राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे झाला होता. स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच खऱ्या गुरु होय. 17 जून 1674 रोजी येथे त्यांचा मृत्यू झाला. पाचाड येथे त्यांची समाधी आहे. 17 जून रोजी स्मृतीदिनानिमित्त पहिली अभिवादन यात्रा काढण्याचा अभिनव निर्णय मावळ्यांनी घेतला असून 15 ते 17 जून दरवर्षी रथ यात्रा निघेल.

बातम्या आणखी आहेत...