आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीत कैद‎:‎अंगणात झाेपलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने‎ ओरबाडले, काठीने मारहाण; मायलेकी जखमी‎

विहामांडवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विहामांडवा‎ येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये चाेरट्यांनी ‎ ‎अंगणात झाेपलेल्या सविता गाैतम बनसाेडे ‎ ‎ अाणि त्यांची मुलगी प्रतीक्षा यांना लाकडी ‎ ‎काठीने जबर मारहाण करत कानातील ‎सोन्याचे झुंबर, वेल अाेरबडून घेतले, तर ‎ ‎ मुलीचा आठ हजार रुपये किमतीचा‎ मोबाइल असा एकूण ४० हजारांचा ऐवज‎ लुटून चोरटे पसार झाले.

दरम्यान,‎ चाेरट्यांनी केलेल्या मारहाणीत मायलेकी‎ गंभीर जखमी झाल्या अाहेत. ही घटना‎ शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास‎ घडली. याप्रकरणी पाचाेड पाेलिसांनी एका‎ संशयिताला ताब्यात घेतले अाहे.‎ गौतम बनसोडे व मुलगा ऋषिकेश हे‎ घरात झोपलेले हाेते, तर गौतम‎ बनसोडेंच्या पत्नी व मुलगी घरासमोरील‎ अंगणात झोपलेल्या होत्या. रात्री तीन‎ ‎वाजेदरम्यान एक चोरटा गेटबाहेर थांबला,‎ तर दुसरा चोरटा गेटवरून उडी मारून‎ अंगणात शिरला.

सविता यांच्या‎ अंगावरील दागिने हिसकावण्याच्या‎ प्रयत्नात असतानाच त्यांना जाग अाली.‎ त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न‎ केला असता चोराने लाकडी काठीने जबर‎ मारहाण करत त्यांच्या एका कानातील‎ सोन्याचे झुंबर व वेल ओरबाडून घेतले.‎ यात त्या रक्तबंबाळ झाल्या. अावाजामुळे‎ मुलीलाही जाग आली अाणि ती‎ ‎ आरडाओरड करताच तिलाही चोराने‎ काठीने मारत तिच्या जवळील मोबाइल‎ हिसकावून पोबारा केला.

दरम्यान, झाेपेतून‎ जागे झालेले गौतम व त्यांचे बंधू‎ आत्माराम बनसोडे यांनी जखमी सविता‎ बनसोडेंसह मुलीला पाचोड येथे‎ दवाखान्यात हलवले. मात्र, गंभीर जखमी‎ असल्याने मायलेकीला पुढील उपचारार्थ‎ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात‎ आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी‎ घटनास्थळी भेट दिली.‎

बाजार समितीच्या सीसीटीव्हीत दोन चाेरटे कैद‎

चाेरट्यांनी सविता बनसाेडे यांच्या ताेंडावर लाकडी काठी मारल्याने त्यांचा जबडा फाटला,‎ तर मुलगी प्रतीक्षा हिच्या पाेटात चाेरट्याने लाथ मारली. सविता यांच्या कानातील सोन्याचे‎ साडेचार ग्रॅमचे झुंबर व दीड ग्रॅमचे वेल ओरबाडून घेतल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या.‎ याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन चोरटे हे बाजार समितीमध्ये‎ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पाेलिस त्यांचा शाेध घेताहेत.‎