आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नुकसान:उस्मानाबाद, परभणीत अवकाळी पाऊस; उस्मानाबाद तालुक्यातील वाघोलीत गारपीट  

उस्मानाबाद / परभणीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अवकाळी पावसाने तसेच वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी, तर परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने तसेच वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यासह तुळजापूर, कळंब, भूम आदी भागातही हलक्या सरी बरसल्या. रविवारी सायंकाळी तसेच रात्री उशिरा उस्मानाबाद शहरात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. सोमवारी सायंकाळी झालेल्या या पावसाने हाहाकार उडाला. आंबा, द्राक्ष, मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले.

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोलीत गारपीट 

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस पडला. यामुळे पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...