आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना चाचणी:अन्यथा स्व खर्चाने शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील केवळ १७ टक्के शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झालेली नसून न चुकता उद्या सोमवार रोजी निर्धारित केलेल्या आरोग्य केंद्रावर जावून तपासणी करुन घ्यावी. सोयीच्या केंद्रावर तपासणी करण्याचे आग्रह करुन नये. अन्यथा अशा शिक्षकांना स्व खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागले. अशा सूचना वजा तंबी जि.प. शिक्षण विभागाने शिक्षकांना दिली आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळांना सुटया देण्यात आल्या होत्या. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आले होते. या ऑनलाइन शिक्षणात अनंत अडचणी देखील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना अनुभवास आल्या. काहींचे म्हणणे होते की, शाळेतच शिकवलेले बरे आहे. तर काहीं जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा सुुर करण्यात येवू नयेत असे वाटते. या सर्व पार्श्वभूमीवर आता सोमवार दि. २३ नोव्हेंबर पासून शाळा सुुर होत आहे. कोविड-१९ बाबात शाळांना विद्यार्थी सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे कडक पालन करायचे असून, सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. शनिवार पर्यंत साडेचार हजार हून अधिक शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली होती. परंतु शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशानावर सोपवल असल्याने मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद राहतील असा निर्णय घेतला. तर सर्व ग्रामीण भागातील इयत्ता ९ ते १२ च्या शाळाच्या शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरु होतील असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

त्यानुसार सोमवार पासून शाळा सुरु होत आहेत. मात्र अद्यापही १७ टक्के शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झालेली नाही. शिवाय शिक्षक ठराविक सोयीच्या ठिकाणी चाचणी करण्याचा आग्रह धरत असल्याचे समोर आले आहे. यावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्या अनुमतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी.चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी पत्राद्वारे सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना सूचना केली आहे की, न चुकता उर्वरित १७ टक्के शिक्षकांनी आरोग्य केंद्रात जावून तपासणी करुन घ्यावी, सोयीच्या केंद्रावर तपासणीचा आग्रह करु नये. अन्यथा अशा शिक्षकांना स्व खर्चाने आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. ७१३० शिक्षकांपैकी ५८९६ म्हणजे ८२.७९ टक्के शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घेतली असून चाचणी करुन न घेतलेल्या ग्रामीण भागातील इयत्ता ९ ते १२ च्या शिक्षकांनी चाचणी करुन घ्यावी असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...