आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सोहळा:दुसऱ्याच्या सुखात आपले, सुख मानावे : औरंगाबादकर

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात संपूर्ण सुख कोणालाच मिळत नाही. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानने म्हणजे खरे सुख होय, असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी केले.

जैन सोशल फेडरेशन आयोजित व शंतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेत पुष्कर औरंगाबादकर यांनी कीर्तीरुपी जीवनाचे सूत्र या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. यावेळी औरंगाबादकर यांचा सत्कार निखिलेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात आला.

औरंगाबादकर म्हणाले, जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाची काळजी घेतो तेव्हा आपल्या सुखाची काळजी आपोआप घेतली जाते. आयुष्य म्हणजे तीन पायांचा चौरंग आहे.प्रत्येकाकडे ३ गोष्टीअसतात. पण कोणाला सांसारिक सुख नसते, कोणाकडे पैसा नसतो, कोणाच्या घरी ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. या चौरंगला नसलेल्या एका पायाकडे लक्ष देण्यापेक्षा असलेल्या ३ पायांवर लक्ष केंद्रित करावे.असलेल्या तीन पायांवर बसून चौथा पाय नसलेल्यासाठी झटणे याला परोपकार म्हणतात. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.

अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिक व संशोधनात्मक चरित्राचा आढावा घेतला. औरंगाबादकर म्हणाले, विषाशिवाय अमृताची, अंधराशिवाय उजेडाचे, दुःखाशिवाय सुखाचे महत्व कळत नाही.आईं, वडिल मुलांना सर्वकाही आयते देऊन त्यांच्यासमोर आयुष्याचे भंपक चित्र निर्माण करत आहेत.मुल संघर्षपासून दूर राहतात. त्यामुळे भविष्यात मुलांना आई, वडिलांची किंमत राहत नाही. स्वागत श्री. संतोष गांधी यांनी केले. आभार सरोज कटारिया यांनी मानले. २४ ला यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...