आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्ववादी भूमिकेला समर्थन:राज ठाकरेंना आमचा पाठिंबा, पक्षाने आदेश दिल्यास भोंगे काढू, हनुमान चालिसाही म्हणू -भागवत कराड

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरेंना आमचा पाठिंबा आहे, पक्षाने आदेश दिला तर भोंगे उतरवू, हुनमान चालीसाही म्हणू, हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालीसा म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझीही हनुमान चालिसा मुखपाठ आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी केले. एकप्रकारे त्यांनी भाजप राज यांच्या पाठीशी असल्याच्या आरोपांचा स्विकारच केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली. यानंतर सर्व थरातून राज यांच्यावर टीकेची झोड उठत असून भाजपकडून मात्र समर्थन मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भागवत कराड यांनीही आपली भूमिका माध्यमासमोर मांडली.

भागवत कराड म्हणाले, शिवसेनेची आणि आमची हिंदुत्वाची भूमिका एकच होती म्हणूनच आम्ही कित्येक वर्ष एकत्र होतो. पण आता शिवसेना महाविकास आघाडी सोबत गेली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने मनसेने मशिदीवरील भोंगा आणि हिंदुत्वाची मुद्दा हाती घेतला आहे. भाजपही सुरवातीपासून हिंदुत्वाचा पुरस्कार करते. जे पक्ष हिंदुत्वाची भूमिका मांडतात त्यांच्यासाठी आमची भूमिका पूरक असणार आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केले.

मनसेशी युतीचा निर्णय फडणवीसांकडे

मनसेची भुमिका हिंदुत्वाची आहे, आमचीही भुमिका त्यांच्याशी पुरक आहे. पण राजकीय भूमिकेबाबत फडणवीस आणि चंद्रकांत पाटील निर्णय घेऊ शकतील असेही ते म्हणाले. मात्र हिंदुत्वावरून आमचा त्यांना पाठिंबा आहे. यामुळे भोंगे उतरविण्यासाठी पक्षाने सांगितल्यास भाजप कार्यकर्ते भोगे उतरवतील, भोंगे उतरवण्यापेक्षा आम्ही हनुमान चालीसा म्हणू शकतो असेही कराड म्हणाले.

अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे राज ठाकरे शहरात आले होते तेव्हा मी शहराध्यक्षांसह इतरांशी चर्चा केली आणि राज ठाकरे यांना मुलाच्या लग्ना निमित्त आयोजित स्वागत समारोहाचे निमंत्रण दिले. ते रिशेप्शनसाठी आले असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...