आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या ‘मेगा जॉब फेअर’ मध्ये १ हजार ३७४ पदवीधरांनी नोंदणी केली होती. यापैकी ४११ जणांना नोकरी मिळाली आहे. नोकरी मिळण्याचे प्रमाण २९.९१ टक्के आहे. औरंगाबाद आणि पुण्याच्या ३० कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यापीठ मुख्य नाट्यगृह परिसरातील वॉटरप्रूफ मंडपमध्ये शुक्रवारी मेगा जॉब फेअर झाले. सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांनी नोंदणीला सुरूवात केली. काही तासांतच १३७४ नोंदणी झाली. विविध कंपन्यांना मुलाखत घेण्यासाठी स्टॉल्सची उभारणी केली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत ४११ जणांनी निवड केली आहे. प्रामुख्याने फ्रेशर्सची निवड केली. त्यामुळे कंपन्यांनी शिकाऊ उमेदवारांना फेअरमध्ये अधिक संधी दिल्याचे दिसून आले. जॉब मिळालेल्या फ्रेशर्सची प्रॉडक्शन असिस्टंट, क्वालिटी सुपरवायझर, सेल्स व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशा पदांसाठी निवड झाली. सरासरी १५ हजार रुपयांचे वेतन म्हणजेच वार्षिक १ लाख ८० हजारांचे पॅकेज देऊ केले आहे. मेळाव्याचे उद्घाटन कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी केले. टीपीओ डॉ. गिरीश काळ यांची उपस्थिती होती. डॉ. चंद्रशेखर जाफरे व संदीप दाभाडे यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
बेसिक ज्ञान नाही: नोकऱ्या मिळवण्यात उमेदवार अपयशी होतात. कारण त्यांच्यात संवाद कौशल्याचे अभाव, आत्मविश्वासाची कमतरता, कोअर नॉलेज नसणे म्हणजेच ज्या क्षेत्रात त्यांना नोकरी मिळवायची आहे, त्यासाठी शिक्षणातील बेसिक ज्ञान नसल्याचे दिसून आले. ज्यांना व्यावसायिक, तांत्रिक कौशल्य अवगत होते, त्या फ्रेशर्सनाही काम मिळाले आहे.
आम्ही प्रशिक्षण शिबिरे घेऊ कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांमधील कमतरतेची लेखी कारणे घेतली. सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्य वाढवण्यासाठी आमच्या सेलतर्फे प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील. -डॉ. गिरीश काळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.