आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलोशिप:महाज्योतीने 1539 अर्जांपैकी 1226 विद्यार्थ्यांना दिली सरसकट फेलोशिप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी १५३९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या मूळ कागदपत्रांची छाननी करून महाज्योतीने १२२६ जणांना पेलोशिप मंजूर केली. निवड झालेल्यांची तात्पुरती यादी बुधवारी जाहीर झाली एक नोव्हेंबरपासून अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे. प्रथम दोन वर्षासाठी दरमहा ३१,००० रूपये, घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च वेगळा दिला जाईल. तीन वर्षांसाठी ३५,००० रुपये दरमहा दिले जातील. या लाभार्थ्यांनाही घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च वेगळा दिला जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फेलोशिप दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पात्र उमेदवारांनी पीएचडी एमआयएसमध्ये पीएच.डी अभ्यासक्रम सुरु असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. एमआयएस प्रणालीत अपलोड केल्यानंतर अधिछात्रवृत्ती विभाग प्रकल्प व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे २२ नोव्हेंबरपर्यंत रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्टाने हार्ड कॉपी पाठवणे बंधनकारक आहे. वेळेत प्रमाणपत्र सदर न करणाऱ्या उमेदवारांना फेलोशिप दिली जाणार नाही. ज्या उमेदवारांचे वर नमूद प्रमाणपत्र योग्य आढळून येईल, त्यांना एमआयएसद्वारेच फेलोशिप प्रदानपत्र डाऊनलोड करता येणार असल्याचेही व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.

दिव्य मराठी’नेही प्रकाशित केले होते वृत्त
तीन वर्षांत खूपच कमी विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे फेलोशिप दिल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. बार्टी, सारथी, महाज्योतीची तुलनाही केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नागपूर येथे संचालक मंडळाच्या बैठकीवर निदर्शने केली होती. इतर मागासवर्गीय मंत्री अतुल सावे हे महाज्योतीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडेही देण्याची केली होती. त्यानंतर हा निर्णय झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...