आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या २५ पैकी १८ जागांचे निकाल मंगळवारी घोषित झाले. राष्ट्रवादीप्रणीत ‘उत्कर्ष’च्या १५ उमेदवारांनी बाजी मारली. अभाविपप्रणीत विद्यापीठ विकास मंचचे ३ उमेदवार विजयी झाले. विद्या परिषदेच्या ६ पैकी ५ उत्कर्षचे तर १ उमेदवार मंचचा विजयी झाला. २० वर्षांपासून विद्यापीठीय राजकारणावर दबदबा असलेल्या संजय निंबाळकरांची एक्झिट झाली, तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळेंची एंट्री झाली आहे.
अधिसभेच्या उर्वरित २९ जागांसाठी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २९ पैकी १ जागा रिक्त असून ३ उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना चव्हाण-आडसकर यांनी संस्थाचालक मतदारसंघातून बिनविरोध बाजी मारली आहे. दोन्ही पॅनलने आडसकर आपल्याच उमेदवार असल्याचा दावा केला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी निवडणुका सुरळीत पार पाडल्या.
विद्यापीठ विकास मंच
संस्थाचालक गट : बसवराज मंगरुळे (३५), महिला प्रवर्ग : अर्चना आडसकर (बिनविरोध) विद्यापीठ शिक्षक :
डॉ. वैशाली खापर्डे (६९), प्राचार्य : डॉ. हरिदास विधाते (५०), अर्चना रमेश आडसकर (बिनविरोध)
डॉ. सानपांनी दिली आमदार सतीश चव्हाणांना टक्कर
‘मंच’चे डॉ. गजानन सानपांनी आ. सतीश चव्हाण यांना टक्कर दिली. यंदा क्लीन स्वीपऐवजी पदवीधर, विद्यापीठ शिक्षक, संस्थाचालकांतून प्रत्येकी एक जागा जिंकली. मंचतर्फे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते पुन्हा विजयी झाले. दहा वर्षांपासून डॉ. सतीश दांडगे अधिसभेवर विजयी होतात. यंदा त्यांना ब्रेक बसला आहे.
विद्यापीठ उत्कर्षचे विजयी उमेदवार
संस्थाचालक : एस.टी. प्रवर्ग : नितीन जाधव (बिनविरोध)
खुला प्रवर्ग : डॉ. मेहेर पाथ्रीकर (३३), गोविंद देशमुख (३२), आश्लेष मोरे (२८)
प्राचार्य : एस. टी. प्रवर्ग : डॉ. शिवदास शिरसाठ (बिनविरोध) एस. सी. प्रवर्ग : डॉ.गौतम पाटील (४६), व्हीजेएनटी प्रवर्ग : डॉ. गोवर्धन सानप (५२),
खुला प्रवर्ग : डॉ .बाबासाहेब गोरे (१५), डॉ. भारत खंदारे (१४), डॉ. विश्वास कंधारे (१३), डॉ. संजय कोरेकर (१३), डॉ. दादा शेंगुळे (११) प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाचपैकी पाच जागा उत्कर्षने जिंकल्या आहेत.
विद्यापीठ अध्यापक गट : डॉ. भास्कर साठे (६०),
एसटी : डॉ. चंद्रकांत कोकाटे (६५)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.