आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतराचा परिणाम:घाटीच्या समितीतून मविआचे आऊटगोइंग, भाजपचे इनकमिंग ; बैठकही ऐनवेळी रद्द करण्याची वेळ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील (घाटी) प्रशासकीय कारभारात महत्त्वाचे स्थान असलेली अभ्यागत समिती महिनाभरात बदलली जाणार आहे. सत्तांतरामुळे आता या समितीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांना निरोप दिला जाईल. त्यांच्या जागी भाजपच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार असल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. या बदलामुळे ३ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित समितीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद शिंदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे आहे. त्यांनी मात्र आपण मुंबईला जाणार असल्याचे कारण देत बैठक पुढे ढकलल्याचे कारण सांगितले.

घाटी प्रशासनाच्या कारभारावर अंकुश ठेवणे, काही लोकोपयोगी कामे सुचवणे आणि दैनंदिन कामकाजात डाॅक्टरांना मदत करणे अशी अभ्यागत समितीची प्रमुख जबाबदारी मानली जाते. या समितीची दरमहा बैठक होते. शहरातील किंवा जिल्ह्यातील आमदार या दहा सदस्यीय समितीचा अध्यक्ष असतो. आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते बहुतांश संख्येने समिती सदस्य असतात. रोज शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांशी थेट संपर्क, घाटीच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाचे स्थान यामुळे सदस्य होण्यासाठी स्पर्धा असते.

आमदार सतीश चव्हाण यांच्यासह नऊ सदस्यांची होऊ शकते हकालपट्टी मविआ सरकार असताना राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, मेहराज इसाक पटेल, डाॅ. मयूर सोनवणे, काँग्रेसचे अॅड. इक्बालसिंग गिल, भाऊसाहेब जगताप, मोहसीन अहमद, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नारायण कानकाटे, प्रवीण शिंदे, प्रमोद ठेंगडे यांना सदस्यपद मिळाले होते. मात्र आता या सर्वांची हकालपट्टी करून नवी समिती स्थापन करण्याचे सावे यांनी ठरवले आहे. आमदार जैस्वालच अध्यक्ष असतील. महिनाभरात नवी समिती स्थापन होईल, असे सावेंनी सांगितले.

नेमलेली समिती कुणालाही दोन वर्षे बदलता येत नाही : अॅड. इक्बालसिंग सहकारमंत्री सावे यांच्या वक्तव्यावर समितीचे विद्यमान सदस्य, काँग्रेसचे पदाधिकारी अॅड. इक्बालसिंग गिल म्हणाले की, एकदा समिती स्थापन झाली की ती दोन वर्षे कायम राहते. कोणाच्याही सांगण्यावरून ती बदलता येत नाही. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या काळात काहीच काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या जागी भाजपच्या चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...