आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत मुलांचे दर आठवड्याला होणार मूल्यांकन:निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिक्षण विभागाची माहिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिवाळी सुट्या नंतर शाळा सुरू होताच प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. या मूल्यांकनात निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्याचा सर्वांसमोर सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

उपक्रमात सहभागी होणे आवश्यक

येत्या 9 नोव्हेंबर दिवाळीच्या सुट्या संपवून पुन्हा शाळांना सुरुवात होत आहे. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम आणि कृतीयुक्त शिक्षण पद्धतींचा अवलंब केला जात आहे. तसेच अध्ययन स्तर निश्चितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील तपासली जात आहे. मात्र हे सर्व उपक्रम राबवित असतांना ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी विद्यार्थी नियमित शाळेत येणे, प्रत्येक उपक्रम त्यांनी सहभाग नोंदविणे देखील आवश्यक आहे. आजही काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संपुर्ण उपस्थिती दिसून येत नाही.

दिवाळी नंतर काही जिल्हयातील काही ठिकाणाहून मजूर असलेल्या पालकांसोबत विद्यार्थी स्थलांतरीत होतात.शेतीच्या कामांसाठी ही मुले जातात. आधिच कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.विद्यार्थी अध्ययन स्तर घसरला आहे. परिणामी विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी नियमित वर्गात असावा यासाठी आठड्यातून एक उत्कृष्ट विद्यार्थी प्रत्येक वर्गातून निवडला जाणार आहे. तशा सूचनाही सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्यात आल्या आहेत. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून आणि या माध्मयातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी. त्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी. यासाठी आठवड्यातील उत्कृष्ट विद्यार्थी हा उपक्रम शाळांमध्ये सुरु करण्यात येत आहे. नियमित अभ्यास करणे, वर्गात पूर्णवेळ उपस्थित राहणे, प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे. अशा प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी निवडूण त्याचा सत्कार, सन्मान हा केला जाणार आहे.

- जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...