आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना सूचना:दर आठवड्याला उत्कृष्ट विद्यार्थी निवडणार ; गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाचा उपक्रम

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिवाळीच्या सुट्यानंतर शाळांमध्ये प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यातून प्रत्येक वर्गातून एक उत्कृष्ट विद्यार्थी निवडून त्याचा सन्मान केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे स्वरूप जिल्हा परिषदेचे सीईओ ठरवणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अध्ययनस्तर निश्चितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. काही शाळांमध्ये अजूनही १०० टक्के उपस्थिती दिसून येत नाही.

नियमित येण्याचा उद्देश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. नियमित अभ्यास करणे, वर्गात पूर्णवेळ उपस्थित राहावे, यासाठी प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थ्याची निवड करून त्याचा सन्मान करणार आहे.-जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...