आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचा खोळंबा:औरंगाबादमधील दोन बसस्थानकातून एका दिवसात तीनशेवर फेऱ्या रद्द; राजकीय आखाड्यामुळे प्रवाशांचे हाल

संतोष देशमुख । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड येथून मंगळवारी रात्री 8.00 वाजता 350 बस शिंदे गट शिवसैनिकांना घेऊन रवाना झाले. त्यामुळे ग्रामीण सहा आणि सिडको व मध्यवर्ती बसस्थानकातून तीनशेवर फेऱ्या रद्द झाल्या आहेत. मात्र, असे असताना बसचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

एका पायावर उभा राहून प्रवास

एका पायावर उभे राहुन त्यांना प्रवास करावा लागला. तर काहींनी जास्तीचे पैसे देऊन खासगी प्रवासी वाहनामधून जाणे पसंत केले. शिवसेनेत उभी फुट पडली आहे. यंदा शिंदे गट व उद्धव गट असे प्रतिस्पर्धी दोन राजकीय गट निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे दोघांनी दसरा मेळावा आयोजित केला. शिंदे गटाने शिक्ती प्रदर्शनासाठी राज्यभर मेळावे घेतले. शिवसैनिकांना ये जा करण्यासाठी बस व खासगी प्रवासी वाहनांची व्यवस्था केली. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील आगारात पैसे भरून आगाऊ पाचशे बसची मागणी केली होती.

त्यापैकी साडेतीनशे बस उपलब्ध करून दिल्याचे विभाग नियंत्रक सिचन क्षीरसागर यांनी सांगितले. आठ आगारात एकूण 548 बसेस आहेत. त्यापैकी 350 बसेस दसरा मेळाव्यासाठी गेल्या आहेत. तर प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून जालना व नगर येथून 100 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी 250 बसेसची तूट होती. त्यांच्या तीनशेवर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील उद्योजक, व्यावसायिक, पर्यटक, विद्यार्थी, सर्वसामान्य हजारो प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन हुकले. दीडपट अधिकचे भाडे देऊन दाटीवाटीत प्रवास करावा लागला.

वेळेचा अपव्यय, प्रवासाचे नियोजन हुकले

चाळीस टक्क्यांवर बसचे आयुर्वमान संपलेले आहे. त्यामुळे पहिलेच बसचे वेळापत्रक कोलमडले त्यात बसेचचा तुटवडा निर्माण झाल्याने दर अर्धा तासाने धावणाऱ्या बसेस एक ते दीडतास उशिराने धावल्या. अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची वाट पहावी लागली. यात अनमोल वेळेचा अपव्यय झाला. तसेच पुढील प्रवासाचे आणि दसरा उत्सव, पुजा, स्नेहमिलन, संवाद कार्यक्रम, खरेदी आदीचे नियोजन हुकल्याने त्यांनी महामंडळाच्या ढिसाळ कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. बहुजन हिताय बहुजन सुखाय ऐवजी राजकीय हित जोपासण्यात महामंडळाने पुढाकार घेतल्याचेही काही प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विभागातून बाहेर ये जा करणाऱ्या व बाहेरच्या आपल्याकडे ये जा करणाऱ्या अशा एकुण किती फेऱ्या रद्द झाल्या, याचा रिपोर्ट आज उपलब्ध होईल.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक. एसटी महामंडळ औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...