आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारकाधीश मंदिरात उत्सव:खाराकुवाच्या अन्नकूट महोत्सवात 56 हून अधिक मिष्ठान्नांचा नैवेद्यट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘श्री द्वारकाधीश की जय’, ‘कृष्णकन्हैयालाल की जय’, ‘गोवर्धननाथ की जय’ असा जयघोष करत पुष्ठीमार्गीय वैष्णव समाजबांधवांनी बुधवारी गोवर्धनपूजन व अन्नकूट उत्सव साजरा केला. खाराकुवा येथील द्वारकाधीश मंदिरातील या कार्यक्रमात १००० भाविकांनी कृष्णारतीला हजेरी लावली. या वेळी ५६ हून अधिक पदार्थांचा समावेश असलेले अन्नकूटाचा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यात आला. पुजारी नीलेश जोशींनी पंचारती करत दर्शन खुले करण्यात आले.

वैष्णव समाजात असाधारण महत्त्व असलेल्या या उत्सवात महिला-पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता. दुपारी २ वाजता शेणाच्या गोर्वधन पर्वताचे पूजन करण्यात आले. यानंतर गायीला मंदिरात आणून तिच्या पायांचा स्पर्श गोवर्धनाला करायला लावला. यानंतर प्रसादाची उधळण करण्यात आली. कृष्णकन्हैयाला सजवण्यासाठी महिलांनी रंगीबेरंगी फुलांच्या माळा हाताने केल्या होत्या. सायंकाळी ८ वाजता अन्नकूटचे दर्शन झाले. यामध्ये २१ किलोच्या सकडी (भात) भोवती गुंजा (मोठ्या करंज्या) मांडण्यात आल्या होत्या. विविध प्रकारच्या भाज्या, १९ ते २२ प्रकारचे मिष्ठान्न, विविध प्रकारचे भजे आणि खीर, बासुंदीचे प्रकार मांडण्यात आले होते.

उत्सवात रक्तदान शिबिरही दिवाळी पाडव्याला केला जाणारा हा उत्सव यंदा खंडग्रास सूर्यग्रहणामुळे पुढे ढकलला होता. क्रांकोळीच्या आदेशानुसार आमचा संपूर्ण समुदाय कार्य करतो. वैष्णव समाजाच्या द्वारकाधीश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून शाळेची निर्मिती केली आहे. याशिवाय रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक जाणीव जपली जाते, अशी माहिती सचिव शिरीष वकील यांनी दिली.

स्नेहमिलनात बांधवांनी घेतल्या भेटीगाठी श्री गुजराती समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश मेहता आणि द्वारकाधीश मंदिराचे चंदुभाई दौलताबादकर यांच्या उपस्थितीत वैष्णव बांधवांनी दिवाळी स्नेहमिलन सोहळाही केला. दिवाळीनिमित्त एकमेकांच्या भेटी आणि गप्पागोष्टींचा हा कार्यक्रमही सायंकाळी गुजराती शाळेच्या प्रांगणात रंगला.

बातम्या आणखी आहेत...