आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:वेगवेगळ्या स्किलमधून काेराेनाच्या अाक्रमणावर मात करा! अांतरराष्ट्रीय खाे-खाेपटू निकिता पवारची प्रतिक्रिया

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • देशाचे नागरिक हे सध्या संरक्षक अाणि काेराेना हा अाक्रमणाच्या भूमिकेत अाहे

एकनाथ पाठक 

काेराेनाच्या संकटामुळे सध्या खेळाडूंच्या अनेक स्पर्धा रद्द झाल्या अाहेत. लाॅकडाऊनमुळे सर्वांच्या सरावाला फटका बसला अाहे. मात्र, अापण घरीच बसून या संकटावर सहज मात करू शकताे. यासाठी नित्यनेमाने अापण याेगा अाणि व्यायाम करावा. यातून अापल्या शरीरातील इम्युनिटी पाॅवर वाढण्यास मदत हाेईल. यातून अापण काेराेनासारख्या संकटाचे अाव्हान सहज परतावून लावू शकताे. त्यामुळे सर्वांनी व्यायामाच्या माध्यमातून या महामारीवर मात करावी, अशी प्रतिक्रिया अांतरराष्ट्रीय खाे-खाेपटू निकिता पवारने दिली. उस्मानाबादच्या या गुणवंत महिला खेळाडूने दक्षिण अाशियाई स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले अाहे.

संकटाला द्या खाे

काेराेना हा सध्या खाे-खाेच्या खेळातील अाक्रमणासारखा अाहे अाणि अापण सर्व नागरिक हे संरक्षकाच्या भूमिकेत अाहाेत. त्यामुळे इम्युनिटी पाॅवरच्या माध्यमातून अापण सुरक्षितपणे अाणि चपळपणे संरक्षक करून काेराेनाच्या संकटापासून स्वत:ला, देशाला वाचवू शकताे. सर्वांना शासनाच्या सर्व नियमांचे काटेकाेर पालन करून या संकटाला खाे देता येऊ शकताे, असेही निकिता म्हणाली.

नियमित व्यायाम व अावडीचे काम करा

लाॅकडाऊनमुळे सध्या सर्वांनाच घरी बसावे लागत अाहे. अशात अापण घरीच नित्यनेमाने व्यायाम करावा अाणि अापल्या अावडी, छंद जाेपासण्यासाठी सक्रिय असावे. याशिवाय घरातील कामाची जबाबदारीही स्वीकारा. यातूनही वेगळा अानंद मिळू शकताे, असे निकिताने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...