आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाचा स्थायीभाव:संकटांवर  मात करत विकास साधणे हाच मानवाचा स्थायीभाव ; ‘शाश्वत प्रगती’ या विषयावर पाचवी ‘मॅट सिलेक्ट’ परिषद

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना किंवा युक्रेन युद्धाने अस्थिरता आली असे मुळीच नाही. मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण संकटांना ताेंड देत आलो आहोत. प्लेग, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध झाले तरीही आपण विकासाच्या दिशेनेच झेपावलो. तेव्हा संकटांवर चर्चा करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा विकासाच्या मार्गांवर चिंतन केले पाहीजे. कारण संकटावर मात करत विकास साधणे हा मानवाचा स्थायीभाव आहे. म्हणून विकासाच्या संधी घेण्यासाठी आपण किती तयार आहोत हा विचार करावा, असा प्रेरणादायी सल्ला एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आणि सीओओ रमेश गेहानी यांनी दिला.

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मटेरियल मॅनजमेंट, औरंगाबाद शाखेतर्फे शनिवारी (१८ जून) रोजी हॉटेल रामा येथे ‘शाश्वत फायदा आणि आव्हानात्मक व्यापारी वातावरणात प्रगती’ या विषयावर पाचवी ‘मॅट सिलेक्ट’ परिषद झाली. त्यात त्यांनी हा सल्ला दिला. मंचावर औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सचे कार्यकारी संचालक विनायक पोळ, आयआयएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. के. शर्मा, औरंगाबाद शाखाध्यक्ष के. श्रीहरी, तांत्रिक समितीचे प्रमुख संजय संघई, कॉन्फरन्स चेअरमन पारस मुथा, सचिव श्रीकांत मुळे, आयसाचे अध्यक्ष सूरज डुमणे, दत्ता बेदाडे उपस्थित होते. शर्मा यांनी कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमसारख्या अनेक नवीन संकल्पनांना जन्म दिल्याचे सांगून आपल्याला या नव्या संस्कृतीशी तातडीने जुळवून घ्यायला हवे, असे सांगितले. शाखाध्यक्ष के. श्रीहरी यांनी प्रास्ताविक केले. संघई, मुथा यांनी परिषद आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आयसाचे अध्यक्ष सूरज डुमणे यांनी संघटनेची भूमिका मांडली. सूत्रसंचालन सुरभी संघई आणि ऋतुजा सोमाणी यांनी केले. कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. अनिल लांबा, टीव्हीएस ग्रुपचे ए. बी. भारती आणि बलबीरसिंग संधू यांनीही मार्गदर्शन केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी आयआयएमएम औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष के. श्रीहरी, उपाध्यक्ष सुशांत पातारे, परिषद आयोजन समिती प्रमुख पारस मुथा, सचिव श्रीकांत मुळे यांच्यासह ललित लोहाडे, आयोजन समिती उपाध्यक्ष सुनील वेद, तांत्रिक समितीचे डॉ. नरेंद्र जोशी, जितेश गुप्ता, अनुराग अग्रवाल, डॉ. अभय कुलकर्णी, फणीकुमार, रूपेश जैन, रमेश जऊळकर, कैलास गाडेकर, डॉ. विजय लोमटे, सुधीर पाटील, योगेश कोशे, महेश जोशी, रवींद्र मोहिते, ललित जांब आदींनी प्रयत्न केले.

संपूर्ण जगाच्या नजरा आपल्याकडे : पोळ आज बहुराष्ट्रीय कंपन्या चीनकडून आपल्याकडे स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. याचा उपयोग आपण कसा करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल, असे विनायक पोळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...