आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतले दर्शन:शिवसेना नेते खैरे म्हणाले -'एमआयएम'ची कृती कट्टरपंथी औरंगजेबासारखी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत येऊन एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी हिंदुच्या शक्तीवर पाय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिथे मुस्लिम लोकही दर्शनासाठी जात नाही अशा औरंगजेबाच्या कबरीवर अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील माथा टेकवतात यांना कशाला हवा औरंग्या, एमआयएमचे नेते काड्या करणारे आणि लोकांना उचकवणारे लोक आहेत अशी जहाल टीका माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी सामाजिक कार्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज खासदार इम्तिजाय जलील यांच्यासोबत औरंगजेबाच्या खुलताबादेतील कबरीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्यावर शिवसेना आणि भाजपकडून टीका झाली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी चांगलाच समाचार घेतला.

खैरे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एमआयएम नेते करीत आहेत, आम्ही त्यांना सोडणार नाही. ​​​​एमआयएमची कृती औरंगजेबासारखी आहे. येथे पाय रोवून हिंदु आणि इतर समाजाला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असेहीअसल्याचेही खैरे म्हणाले.

मुस्लिम बांधवही कबरीकडे फिरकत नाही

​​​ खुलताबादेत मुस्लिम समाजही औरंगजेबाच्या कबरीकडे जात नाही. औरंगजेब दृष्ट होता त्याने हिंदुसोबतच मुस्लिम समाजालाही त्रास दिला. झिझिया कर लावला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन एमआयएमचे लोक माथा टेकवतात. इम्तियाज जलील असे वाद वाढवत आहेत. अकबरुद्दीन ओवैसींनी हिंदु धर्मीयांच्या विरोधात वक्तव्य केले होते. रामावरुनही वक्तव्य केले होते. आता ते औरंगाबादेत वातावरण खराब करण्यासाठी आले आहेत. अशा शब्दातही खैरेंनी हल्ला चढविला.

ओवैसींचा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न

संभाजी महाराजांचा औरंगजेबाने वध केला. संभाजी महाराजांचा जयंती उत्सव आम्ही साजरा करीक आहोत. परवाच हा उत्सव आहे आणि याचदरम्यान एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी खुलताबादेत जातात म्हणजेच त्यांचा वातावरण तापवण्याचा उद्देश दिसून येतो असेही खैरे म्हणाले

शाळा काढली स्वागतच करतो पण नुसती उठाठेव करु नका

चांगले काम करा, शाळेचे काम, रुग्णालय उघडता हे चांगलेच आहे पण हे सोडून कबरीवर जाण्याची गरज काय आहे. चुकुन झालेले खासदार इम्तियाज जलील हे कारस्थान करीत आहेत असा टोलाही खैरे यांनी यावेळी लगावला.

हिंदुंच्या शक्तीवर पाय देण्याचा प्रयत्न

औरंगाबादेत राजकीय हिंदुच्या शक्तीवर पाय देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही. एमआयएमला कशाला हवा औरंग्या असा सवाल करीत एमआयएमचे नेते म्हणजे काड्या करणारे आणि उचकवणारे लोक आहेत अशी टीकाही खैरे यांनी केली.

इम्तियाज जलील यांनी मुलाचे नाव औरंगजेब का ठेवले नाही?

एमआयएम कशी आहे हे आम्ही आम्ही जनतेला दाखवून देऊ, सर्वच दर्ग्यावरू हिंदु-मुस्लिम बांधव जातात. आम्ही मुलाचे नाव संभाजी, शिवाजी असे ठेवतो आम्ही त्यांचे पुजन करतो जर औरंगजेबाच्या कबरीवर इम्तियाज जलील माथा टेकवत आहेत तर त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब का ठेवले नाही असा टोलाही इम्तियाज जलील यांना खैरे यांनी लगावला.

एमआयएमची कृती औरंगजेबासारखी

एमआयएमची कृती औरंगजेबासारखी आहे. येथे पाय रोवून हिंदु आणि इतर समाजाला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इम्तियाज जलील आधी दावा करीत होते की, औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनासाठी गेल्याचे पुरावे दाखवा आता थेट व्हिडिओ आणि फोटोच समोर आले आहे. आता गुढघे, मस्तक टेकवले हे आम्ही पहिल्यापासूनच बोलत होतो. हैद्राबादी माणसं रझाकारीची जाणीव करुन देण्यासाठी येथे येत आहेत. जिल्ह्याचे राजकारण आणि वातावरण खराब करण्यासाठी ते येत असल्याचेही खैरे म्हणाले.

एमआयएम, निझाम, औरंगजेबाचे विचार एकच- अंबादास दानवे

एमआयएम नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढविणे आश्चर्य नाही. एमआयएम, निझाम आणि त्याआधीची राजवट यांचे विचार एकच आहेत. धर्मद्रोही, समाजात भांडणे लावणारा, महाराष्ट्र भूमीला तोडणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली. देशाच्या हितवरोधी एमआयएम पासून सावधान राहावे. भाजप याच एमआयएमला मदत करीत असून राज ठाकरे आणि एमआयएम सारखीच भूमिका वठवित असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.

एमआयएमने औरंगजेबाची औलाद असल्याचे दाखवून दिले -दरेकर

भाजप नेते प्रविण दरेकरांनी अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगजेबाचे दर्शन घेतल्यावरुन टीका केली. ओवैसी औरंगजेबाची औलाद असल्याचे त्यांनी कबरीवर माथा टेकवून दाखवून दिले अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रीया दिली.

बातम्या आणखी आहेत...